महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

युवकाची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या, कारण अस्पष्ट - vasmat railway station

पूर्णा रेल्वे मार्गावर वसमत येथे राज रेल्वे रुळाच्या मधोमध झोपला. यावेळी रेल्वे अंगावरुन गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यात युवकाचा जागीच मृत्यू झाला.

हिंगोलीतील युवकाची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या
हिंगोलीतील युवकाची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या

By

Published : Dec 2, 2019, 4:08 PM IST

हिंगोली- रेल्वे पटरीवर झोपून युवकाने आत्महत्या केल्याची घटना वसमत येथे घडली आहे. राज पुरुषोत्तम मद्दीलवर (28) रा. बुधवार पेठ वसमत असे युवकाचे नाव आहे. आत्महत्यचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेचा पंचनामा सुरू आहे.

पूर्णा रेल्वे मार्गावर वसमत येथे राज रेल्वे रुळाच्या मधोमध झोपला. यावेळी रेल्वे अंगावरुन गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. यात युवकाचा जागीच मृत्यू झाला. याबद्दलची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details