हिंगोली- वसमत तालुक्यातील नाहद एका १८ वर्षीय तरुणाने ३७ वर्षीय चुलतीशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या २ ते ३ वर्षांपासून दोघांत प्रेमसंबंध होते. आज (रविवारी) त्यांनी ग्रामस्थांच्या साक्षीने मंदिरात लग्न केले. मातृत्व दिनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेची जिल्ह्यात चर्चा होत आहे.
धक्कादायक..! १८ वर्षीय पुतण्याचा ३७ वर्षीय चुलतीसोबत प्रेमविवाह - married
गेल्या २ ते ३ वर्षांपासून दोघांत प्रेमसंबंध होते. आज (रविवारी) त्यांनी ग्रामस्थांच्या साक्षीने मंदिरात लग्न केले. मातृत्व दिनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेची जिल्ह्यात चर्चा होत आहे.
तरुण आणि त्याची चुलती गेल्या अनेक वर्षापासून कुटुंबासह शेतात वास्तव्यास आहेत. यातून पुतण्याचे ३७ वर्षीय चुलतीसोबत प्रेमसूत जुळले. लपून-छपून त्यांच्या गाठी-भेटी वाढत गेल्या. त्यांचीतील प्रेम प्रकरण एवढे रंगले की, त्यांनी प्रेमविवाह करण्याचे ठरवले. शेवटी त्यांनी गावातील मंदिरात जाऊन एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालत विवाह केला.
नात्याने दोघे चुलती-पुतणे असलेल्या या जोडप्याचे प्रेम संबंध गेल्या २-३ वर्षांपासून चांगलेच चर्चेत आलेले. चुलतीला २ अपत्येही असून नवरादेखील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याने विवाहाला संमती दिलीच कशी? यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत. या दोघांचा प्रेमविवाह अचानक झाल्याने गावामध्ये मात्र एकच खळबळ उडाली आहे.