महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत गरोदर महिलांसाठी 'यशोदा माहेरघर' - Pregnant women

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जामठी बुद्रुक येथे गरोदर महिलांसाठी यशोदा माहेरघराची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व सोयीसुविधा असलेले, हे यशोदा माहेरघर गरोदर महिलांसाठी विश्रांतीस्थान बनले आहे.

Jamthi Budruk sengaon hingoli
यशोदा माहेरघर जामठी बुद्रुक हिंगोली

By

Published : Feb 6, 2020, 6:04 AM IST

हिंगोली - महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जामठी बुद्रुक येथे गरोदर महिलांसाठी यशोदा माहेरघराची निर्मिती करण्यात आली आहे. सर्व सोयीसुविधा असलेले, हे यशोदा माहेरघर गरोदर महिलांसाठी विश्रांतीस्थान बनले आहे. गरोदर महिलांना विश्रांती घेता यावी, तसेच गरोदर काळात त्यांची विशेष देखभाल घेण्यासाठी म्हणून ग्रामस्थांच्या सहकार्यातुन या माहेरघराची स्थापना करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जामठी बुद्रुक येथे गरोदर महिलांसाठी यशोदा माहेरघराची निर्मिती...

हेही वाचा... कोरोनावर मात करण्याची ताकद आयुर्वेदात; जाणून घ्या काय आहेत उपाय ?

जामठी बुद्रुक येथे ग्रामपंचायतच्या वतीने नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात. आताही गावात महिलांसाठी त्यातही गरोदर महिलांसाठी राबवलेल्या या आगळ्या वेगवेगळ्या उपक्रमाची सर्वदूर चर्चा होत आहे. या यशोदा माहेरघरात विश्रांतीसाठी अनेक पलंग ठेवण्यात आले आहेत. त्यासोबतच औषधोपचार, आहार, आरोग्याची काळजी कशी द्यावी, यासाठी एलईडीद्वारे गर्भसंस्कार मार्गदर्शनाची व्यवस्था केली आहे.

हेही वाचा... मध्य प्रदेश : मुले चोरीच्या संशयावरून सहा शेतकऱ्यांना मारहाण, एकाचा मृत्यू

अनेक गरोदर मातांना घरी आराम करता येत नाही किंवा दुपारच्या वेळी घरात असलेल्या गोंधळामूळे महिलांमध्ये चिडचिड येते. त्याचा महिलाच्या विशेषतः गरोदर महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे अशा महिलांना हे माहेरघर खूप फायदेशीर ठरू शकते. दुपारी 12 ते 3 या वेळेत हे विश्रांतीघर उघडे राहणार आहे. त्यामुळे निश्चितच या माहेरघराचा गरोदर महिलांसाठी उपयोग होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details