महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; कौटुंबिक कलाहातून टोकाचे पाऊल

हिंगोली जिल्ह्यातील कानडखेडा गावात एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी घडली.

Suicide
आत्महत्या

By

Published : Nov 8, 2020, 7:29 PM IST

हिंगोली -जिल्ह्यात एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी कानडखेडा गावात घडली. पतीसोबत झालेल्या वादानंतर तिने विहीरीत उडी घेतल्याचे समोर आले आहे. अंकिता नितीन कांबळे (१९) असे मृताचे नाव आहे.

वर्षभरापूर्वी झाला होता प्रेमविवाह -
अंकिता आणि नितीन या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांनी वर्षभरापूर्वी त्यांचा विवाह लावून दिला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नितीन हा दारूच्या आहारी गेल्याने दोघांमध्ये वाद उद्भवत होते. हा वाद एवढा विकोपाला गेला की, अंकिताने स्वतःच्या शेतातील विहीर गाठून उडी घेतली आणि तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच, गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमनवार, कनेरगावचे पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील, नांदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हासामान्य रुग्णालयात रवाना केला.

ABOUT THE AUTHOR

...view details