महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोली : पतीच्या खांद्याला खांदा लावून पत्नी करते विद्युत मोटारी दुरुस्तीचे काम

केवळ पतीच्या कामाकडे पाहूनच एका महिलेने विद्युत मोटार दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. या कामात ती आपल्या पतीला मदत करत आहे. जयश्री गोविंद अंभोरे असे त्या महिलेचे नाव आहे.

By

Published : Apr 26, 2019, 3:32 PM IST

पतीच्या खांद्याला खांदा लावून पत्नी करते विद्युत मोटारी दुरुस्तीचे काम

हिंगोली - आज काल महिला या कोणत्याही प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. शेतीची कामे करण्यापासून ते विमान चालविण्यापर्यंत महिलांनी बाजी मारली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आपले कर्तव्य अतिशय उत्कृष्टपणे पार पाडत असल्याचे दिसून येथे. हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथेही असेच एक उदाहरण पाहायला मिळत आहे.

पतीच्या खांद्याला खांदा लावून पत्नी करते विद्युत मोटारी दुरुस्तीचे काम

केवळ पतीच्या कामाकडे पाहूनच एका महिलेने विद्युत मोटार दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. या कामात ती आपल्या पतीला मदत करत आहे. जयश्री गोविंद अंभोरे असे त्या महिलेचे नाव आहे. जयश्री यांच्या पतीचे आखाडा बाळापूर येथे १२ वर्षांपासून विद्युत मोटार दुरुस्तीचे दुकान आहे. गोविंदने आपल्या भावाकडून विद्युत मोटार दुरुस्तीचे काम शिकले. त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांना इच्छा असूनही पुढील शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे त्यांनी जेम तेम बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले, अन आपल्या भावासोबत विद्युत मोटार दुरुस्तीचे काम शिकले.

पूर्ण काम शिकल्यानंतर आपणही आता स्वतः च विद्युत मोटार दुरुस्ती करतो, असा आत्मविश्वास वाढल्याने त्यानी बाळापूर येथे लहानसे दुकान थाटले. मात्र, भावासोबत काम करत असताना, त्यानी ग्राहकांसोबत ठेवलेला संपर्क खूपच फायद्याचा ठरला. मोटार दुरुस्तीस आल्यानंतर ती मोटार ग्राहकांना वेळेत कशी देता येईल, यावर त्यांचा अगदी सुरुवातीपासून भर आहे. ग्राहकाला दिलेला वेळ टळूच द्यायचा नाही, यासाठी ते मोठ्या जिद्दीने अन चिकाटीने काम करू लागले. त्यामुळे दिवसेंदिवस दुरुस्तीसाठी मोटारीची संख्या वाढू लागली.

एकट्याला वेळेत मोटारी देणे शक्य होत नव्हते, त्यामुळे दुकानात दोन कारागीर वाढविले. अंभोरे हे संपूर्ण वेळ दुकानातच घालत असल्याने, त्यांना जेवण्यासाठी देखील वेळ मिळत नव्हता. त्यामुळे अंभोरे यांची पत्नी घरचे सर्व कामे करून जेवणाचा डबा घेऊन दुकानावर येत असे. त्या काळात कारागीर, पतीचे सुरू असलेले विद्युत मोटारी दुरुस्तीचे काम त्या रोजच पाहत असत. असे जवळपास बरेच दिवस सुरू राहीले. मग मोटारची तांब्याची वायर बनवून देणे, मोटारीतील तार कापणे अशी कामे त्या करू लागल्या, त्यांना या कामाची गोडी लागत गेली. आज त्या मोटारीबरोबरच पंखा, कुलर अशी सर्वच विद्युत उपकरण दुरुस्त करू शकतात.

सहसा इतर कोणत्याही क्षेत्रात महिला असतात, मात्र मोटारी दुरुस्तीच्या कामात महिला दिसत नाहीत. जयश्रीताई विद्युत मोटार दुरुस्तीच्या कामाने जिल्ह्यात चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. आजही गोविंदराव यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मोटार दुरुस्तीसाठी येतात, विशेष म्हणजे बाराही महिने दुरुस्ती साठी मोटारीची येणारी संख्या अजिबात कमी होत नाही. त्यामुळे अंभोरे यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेताकडे त्याना पाहणे देखील होत नाही. केवळ दुकानावरच काम नियमित सूरु असल्याने, आता जयश्री देखील घरची सर्व कामे आटोपून दुकानावर येतात अन मोटार दुरुस्तीची कामे करत आहेत. त्यांच्या हाताला एवढी गती आलेली आहे, की कधी काळी एखादा कारागीर सुट्टीवर गेला असला तरी अगदी वेळेतच ग्राहकांना मोटार दुरुस्त करून दिली जाते.

आजही हे पती-पत्नी ग्राहकांना वेळेवर मोटार भरून देत असल्याने मोठ्या विश्वासाने याच ठिकाणी विद्युत मोटारी दुरुस्तीसाठी येतात. प्रारंभी एका बँकेचे कर्ज अंभोरे यांनी घेतले होते, मात्र ते कर्ज अवघ्या एकाच वर्षात फेडल्यामुळे त्याना आजही बँकेचे व्यवस्थापक स्वतःहून कर्ज देण्याची तयारी दर्शवितात. ते वेळ आली तर बघू असेच ही जोडी सांगते. मात्र जयश्री आपला जराही वेळ वाया न जावू देता मोटार दुरुस्तीचे काम करत असल्याचे पाहून रस्त्यावरून ये जा करणारे देखील अचंबितच होतात. जयश्री म्हणतात की कोणतीही गोष्ट मनात आणली तर कठीण नसते, महिलांनी केवळ चूल आणि मूल न बघता, कोणतेही काम करण्याची तयारी असावी लागते. या जगात कोणतीच गोष्ट अशी नाही की ती महिला करू शकते. कोणत्याही महिला आप- आपल्या परीने प्रत्येक क्षेत्रात आपले नाव मोठे करू शकतात. माझ्या पतीमुळेच मला मोटार दुरुस्ती चे काम शिकण्याची संधी उपलब्ध झाली. आता उत्पन्नही चांगले वाढू लागल्याने घरची परिस्थितीही सुधारण्यासाठी मदत झाली असल्याचे जयश्री अंभोरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details