हिंगोली - बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या एका पादचारी महिलेला क्रेनने चिरडले. तिच्या कंबरेवरून क्रेनचे चाक गेल्याने पूर्णपणे चेंदामेंदा झाला. तिचा जागीच मृत्यू झाला असून नगर पालिकेजवळ ही घटना घडली. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
'तिनं' दिवसभर रांगेत उभं राहून खात्यावर जमा झालेले शे-दोनशे काढले, अन् बँकेतून बाहेर येताच क्रेनने चिरडले
जमुनाबाई निळोबा दराडे (55) रा. नांदूसा ता. कळमनुरी, असे मृत महिलेचे नाव आहे. सध्या विविध योजनेअंतर्गत बँकेत लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले जात आहे. हे अनुदान काढून घेण्यासाठी लाभार्थी महिला या जराही जीवाची पर्वा न करता हिंगोली याठिकाणी बँकेत धाव घेत आहेत. पैसे काढण्यासाठी दिवसभर बँकेसमोर रांगेत उभे राहतात. अशीच ही महिला देखील बँकेच्या कामानिमित्त हिंगोली येथे आली होती. काम झाल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी निघाली असता नगरपालिकेपासून काही अंतरावर तिच्या अंगावरून क्रेनचे चाक गेले.
जमुनाबाई निळोबा दराडे (55) रा. नांदूसा ता. कळमनुरी, असे मृत महिलेचे नाव आहे. सध्या विविध योजनेअंतर्गत बँकेत लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले जात आहे. हे अनुदान काढून घेण्यासाठी लाभार्थी महिला या जराही जीवाची पर्वा न करता हिंगोली याठिकाणी बँकेत धाव घेत आहेत. पैसे काढण्यासाठी दिवसभर बँकेसमोर रांगेत उभे राहतात. अशीच ही महिला देखील बँकेच्या कामानिमित्त हिंगोली येथे आली होती. काम झाल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी निघाली असता नगरपालिकेपासून काही अंतरावर तिच्या अंगावरून क्रेनचे चाक गेले. यामध्ये शहरातील आतडे बाहेर पडले होते. तसेच अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर रुग्णावाहिकेने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. महिलेच्या पिशवीत बँक पासबुक आढळल्याने पासबुकच्या आधारे घरच्यांना संपर्क साधून माहिती देण्यात आली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, याप्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आला नाही. मात्र, नागरिकांनी क्रेनला अडवून ठेवले होते.