हिंगोली - जिल्ह्यातील सेनगाव येथे विहिरीचे खोदकाम करताना क्रेनचा एक पाय तुटुन क्रेन उलटली. या क्रेनखाली पती पत्नी दबले गेले. यापैकी पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नीचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. सुभाष सुर्वे असे मृत मजुराचे नाव आहे तर चंद्रभागाबाई सुर्वे (रा. वस्सा) गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विहिरीचे खोदकाम करताना क्रेन उलटली; पती ठार, पत्नी गंभीर - sengaon
विहिरीतून अवजड दगड क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले जात होते. दगड वर काढण्यासाठी क्रेन गेले, अन क्रेन चा एक पाय मोडला. आणि क्रेन आडवे पडले. त्या खाली दोघे पती पत्नी दबल्या गेले होते. पती सुभाष यांच्यावर जास्त भार पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सेनगाव येथील मारोती मंदिराच्या पाठीमागे भास्कर देशमुख या शेतकऱ्याच्या विहिरीचे खोदकाम सुरू आहे. सुभाष सुर्वे व इतर काही मजूर कामाला आहेत. आज सकाळी पासून विहिरीचे गतीने खोदकाम सुरू असताना. विहिरीतून अवजड दगड क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढले जात होते. दगड वर काढण्यासाठी क्रेन गेले, अन क्रेन चा एक पाय मोडला. आणि क्रेन आडवे पडले. त्या खाली दोघे पती पत्नी दबल्या गेले होते. पती सुभाष यांच्यावर जास्त भार पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी चंद्रभागा यांच्यावर क्रेनचा सांगडा पडला. यात दोन्ही पाय दबल्या गेल्याने पाय निकामी झाले आहेत.
या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. जखमी महिलेवर जिल्हासामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या विविध योजना तसेच स्वखर्चातून विहिरीचे खोदकाम सुरू आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील मजूर मोठया संख्येने हिंगोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात विहिरीचे काम घेतलेले असल्याने जीवाची जराही पर्वा न करता हे मजूर विहिरीचे खोद काम करतात. या प्रकरणी अजून तरी कोणतीही नोंद झालेली नाही.