हिंगोली - जिल्ह्यात यावर्षीही भीषण पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. आज जिल्ह्यात १३ गावांमध्ये टँकर मागवला जात आहे. अजूनही बऱ्याच गावांतील ग्रामपंचयतीच्या वतीने टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये दाखल झाले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एवढी भीषण पाणीटंचाई जाणवत असेल तर अजून २ महिने कसे निघतील ? हाच मोठा प्रश्न ग्रामस्थ आणि प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई ; १३ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू - water issue
मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एवढी भीषण पाणीटंचाई जाणवत असेल तर अजून २ महिने कसे निघतील ? हाच मोठा प्रश्न ग्रामस्थ आणि प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
प्राप्त प्रस्तावाची पाहणी करून पथक त्या गावात जाऊन पाहणी करून टँकरच्या प्रस्तावाला मंजुरी देत आहेत. यावर्षीही जिल्ह्यामध्ये कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत पूर्णतः कोरडे पडले आहेत. तापत्या उन्हातही ग्रामस्थ रानावनात विहिरींचा शोध घेत असल्याचे चित्र आहे.पाणी समस्येमुळे बऱ्याच गावातील ग्रामस्थांनी जिल्ह्यात कामानिमित्त धाव घेतली आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने तलावात पाणी असताना पाणी उपसा थांबावण्यासाठी दाखवलेली निष्क्रियता आता भोवतेय.
या गावांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून - कणका, लोहगाव, माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु, जयपूर, सेनगाव, कहाकर बु, बाभूळगाव, रामेश्वर तांडा, संघनाईक तांडा, काळापाणी तांडा, येहळेगाव सोळंके या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तर अजूनही १८ गावांकडून टँकरची मागणी केली जात आहे.