हिंगोली - मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती होणे गरजेचे असते. यासाठी हिंगोली येथे जिल्हा प्रशासन स्वीप समिती, हिंगोली नगर परिषद आणि योगविद्या धाम संस्थेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली.
सायकल रॅलीद्वारे हिंगोलीत मतदान जनजागृती - maharastra assembly election 2019 news
रॅलीत हिंगोली शहरातील मोठ्या संख्येने नागरिक सहाभागी होते. यावेळी मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयापासून सुरुवात झाली.
हेही वाचा-पुण्यात मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट प्रकल्प महत्वाचा - प्रकाश आंबेडकर
रॅलीत हिंगोली शहरातील मोठ्या संख्येने नागरिक सहाभागी होते. यावेळी मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. रॅलीची जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयापासून सुरुवात झाली. पाण्याची टाकी-जिल्हा न्यायालय-माधव हॉस्पीटल-शिवाजी चौक-पोस्ट ऑफिस-जवाहर रोड-गांधी चौक-कापड गल्ली-दत्त मंदिर-मंगळवारा-पोळा मारुती-हरण चौक-इंदिरा चौक-शिवाजी महाराज पुतळा मार्गे रॅली निघाली. पोवाडा गात मतदारांना आपल्या मताचे महत्व पटवून देण्यात आले. अवघे पाच दिवस मतदाणासाठी शिल्लक आहेत. तुमचं एक मत हे देशाच्या भविष्यासाठी महत्वाचे आहे. यावेळी फलकाद्वारे देखील जनजागृती केली गेली. सर्व कामे बाजूला ठेवत मतदान करा, असा संदेश या रॅलीमधून देण्यात आला.