महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोली : बाहेरून येणाऱ्या मतदारांसाठी माळसेलुकरांनी केली जेवणाची सोय, मतदारराजा सुखावला - voters

बाहेरून येणाऱ्या मतदारांसाठी हिंगोलीत माळसेलु ग्रामस्थांनी केली जेवणाची सोय.... मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केलेला माळसेलु ग्रामस्थांचा कौतुकास्पद उपक्रम... निवडणूक आयोगाकडूनही केली जातीय जनजागृती

मतदारांसाठी जेवणाची सोय

By

Published : Apr 18, 2019, 12:18 PM IST

Updated : Apr 18, 2019, 12:25 PM IST

हिगोली- लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यासाठी निवडणूक आयोग जनजागृती करत असताना ग्रामीण भागातील ग्रामस्थही मतदानवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील माळसेलु येथे बाहेरगावावरून मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना ग्रामस्थांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या उपक्रमाचे मतदारातून स्वागत केले जात आहे.

मतदारांसाठी जेवणाची सोय

जिल्ह्यातील बरेचसे मतदार नोकरी निमित्त बाहेरगावी अथवा शहरामध्ये स्थलांतरीत झाले आहेत. मात्र, त्यांचे मतदान त्यांच्या मुळ गावातच आहे. असे मतदार लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वेळात वेळ काढूण गावाकडे येतात. मात्र, गावात येणारा तो मतदार आपल्या गावातून उपाशीपोटी जाऊ नये म्हणून ग्रामस्थ त्यांची काळजी घेत आहेत. तसेच सध्या तापमानात वाढ झाल्यामुळे मतदारांचा उन्हापासून बचाव करण्यासाठीही मतदान केंद्र परिसरात मंडप उभारण्यात आलेले आहेत.

माळसेलु येथील मतदान केंद्रावर सध्या मतदानासाठी मतदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद दिसून येत नाही. आतापर्यंत महिला २४५ आणि ३०५ पुरुष असे एकूण ५५० मतदान झाले आहे. मालसेलू येथे एकूण १७०० मतदान आहे.

Last Updated : Apr 18, 2019, 12:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details