महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 24, 2020, 12:40 PM IST

ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबईतील घाटकोपर व कुर्ल्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी कुर्ल्यात मात्र आंदोलनाला हिंसक वळण लागले.

vanchit-bahujan-aghadi-maharashtra-bandh-call-huge-responce-in-hingoli
हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगोली -वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदच्यावतीने विविध मागण्यासाठी बंदची हाक दिली होती. मुंबईतील घाटकोपर व कुर्ल्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी कुर्ल्यात मात्र आंदोलनाला हिंसक वळण लागले. तसेच हिंगोलीतील वर्दळीचे ठिकाण असलेल्या गांधी चौक येथील सविधान कॉर्नर येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निदर्शने केली. विविध संघटनांनी या बंदला प्रतिसाद दर्शवत व्याप्याऱ्याने देखील आपली दालने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग दर्शविला आहे.

हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये हा बंद पाळण्यात आला आहे. वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी यासह हिंगोली येथे विविध संघटनांच्यावतीने बंद पुकारण्यात आल्यामुळे हिंगोली शहरात शुकशुकाट दिसून येत होता. एवढेच नव्हे तर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने हिंगोली येथील गांधी चौक येथे निदर्शने करण्यात आली. यामध्ये विविध मुस्लिम संघटना सहभागी झाल्याचे दिसून आले. तसेच हिंगोली सह पाथरी तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिंगोली येथे आंदलकांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केल्यानंतर विविध मागण्याचे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा -घाटकोपरमध्ये 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला उस्फूर्त प्रतिसाद तर कुर्ल्यात हिंसक वळण

ABOUT THE AUTHOR

...view details