हिंगोली - वसमत तालुक्यातील पारडी बागल येथील मित्राकडे रंगपंचमी साजरी करण्यासाठी नांदेडहूनआलेल्या दोन तरुणांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. अनिल बबनराव खरे(रा. खोब्रागडे नगर) आणि अवधूत आबगोड कोयलवाल(रा. पौर्णिमा नगर) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
नांदेडहून अनिल आणि अवधूत हे दोघेजण आपल्या मित्रांसमवेत पारडी बागल येथील एका मित्राकडे रंगपंचमी साजरी करण्यासाठी आले होते. रंगपंचमी साजरी केल्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला एक शेततळे दिसले. त्यात पोहण्यासाठी जायचे ठरवले. मात्र, काही मित्रांनी नकार दिला. यावेळी कुणाचेही न ऐकता त्यांनी तळ्यात पोहण्यासाठी उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या दोघांचाही त्यात बुडून मृत्यू झाला.