हिंगोली- जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कवडी शिवारात पाण्याच्या डोहामध्ये अंघोळीसाठी गेलेल्या मेंढपाळाच्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
डोहात बुडून दोन मेंढपाळांच्या मुलांचा मृत्यू - हिंगोलीत पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू
जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कवडी शिवारात पाण्याच्या डोहामध्ये अंघोळीसाठी गेलेल्या मेंढपाळाच्या दोन मुलांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याची घटना आज (सोमवार) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
येरसी सखु रबारी (वय ८ वर्षे), विसा हिरा रबारी (वय १२ वर्षे) असे मयत मुलांची नावे आहेत. गुजरात येथील कच्छ भागातील अंजार तालुक्यामधील हे मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील डोंगर भागात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. नेहमीप्रमाणे मेंढपाळ हे आपल्या मेंढ्या घेऊन करण्यासाठी गेले होते.
दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चार मुले आंघोळीसाठी काही अंतरावर असलेल्या डोहामध्ये गेले होते. अंघोळ करत असताना दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर सोबत गेलेल्या दोघांनी आपल्या नातेवाईकाकडे धाव घेत दोघे बुडण्याची माहिती दिली. त्यामुळे नातेवाईकांनी तात्काळ डोहाकडे धाव घेतली. घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना कळताच घटनास्थळी पोहचले आणि पंचनामा केला. दोन्ही मुलांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.