हिंगोली - शहरातील पावर हाऊस परिसरातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनी बेपत्ता झाली आहे. ही विद्यार्थिनी रूमवर जाते म्हणून गेली, परंतू ती पून्हा परतलीच नाही. बराच वेळ तिचा शोध घेतल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात गृहपाल दिक्षा नाखले यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -हिंगोलीत भाजपचे राहुल गांधींविरोधात आंदोलन
शहरातील पावर हाऊस जवळ शासकीय आदिवासी विद्यार्थिनींचे वसतिगृह आहे. याच वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थिनी ही रविवारी वसतिगृहातून बाहेर पडत असताना नोंदवहीत तिने 'मी रूमवर जातेय' अशी नोंद केली होती. मात्र, रात्री सात वाजले तरी ती परत आली नाही. त्यामुळे गृहपाल नाखले आणि कर्मचाऱ्यांनी बराच वेळ त्या विधार्थिनीचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. विद्यार्थिनी गावी गेली असण्याची शक्यता असल्याने तिच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, ती विद्यार्थिनी गावी देखील पोहोचली नसल्याचे समजले. वस्तीगृहातील इतर विद्यार्थिनींकडेही तीची चौकशी करण्यात आली. मात्र, तिच्याबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाही.
हेही वाचा -अंधश्रद्धेचा आणखी एक बळी; भानामती करण्याच्या संशयातून एकाची हत्या
दरम्यान, गृहपाल नखाले यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. त्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने मात्र हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरिक्षक केनेकर हे याप्रकरणाचा तपास करत आहेत.