हिंगोली- जिल्ह्यातील सिरसम डिंग्रस बु ते डीग्रस वाणी मार्गावर अरूंद असलेले ट्रक्टरचे हेड अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर चालका सोबत असलेल्या मित्राने मात्र घटनास्थळावर पळ काढला. ही घटना मंगळवार सकाळी साडे आठच्या सुमारास घडली. यामध्ये अद्याप मृताची ओळख पटलेली नाही. तर वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील ट्रॅक्टर असल्याची माहिती समोर आली आहे.
हिंगोलीत ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागीच मृत्यू - tuesday
हिंगोली येथे ट्रॅक्टरचा हेड उलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला.
डीग्रस वाणी ते सिरसम मार्गे जाणाऱ्या रस्त्याची मोठी दुरवस्था झालेली आहे. नेहमीच या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडतात. सध्या या भागात विहिरीचे खोदकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राजस्थानमधून ट्रॅक्टरवरील बोअरिंग दाखल झाले आहेत. मात्र बऱ्याच चालकांना रस्त्याची ओळख नसल्याने अन रात्रीची वेळ असल्याने या चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. अरुंद रस्त्यावरून ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर पलटी झाली. यात चालक ट्रॅक्टरच्या हेड खाली दबल्या गेला. घटनास्थळी दोन चपलाचे जोड पडले असल्याने ट्रॅक्टरच्या हेड वर दोघे असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे. तो घटनास्थळी कुठेही दिसून आला नसल्याने तो पळून गेल्याचा अंदाज आहे. ट्रॅक्टर मात्र विना पसिंगचे असून नंबर देखील नाही. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक तायवाडे, पोलीस उपनिरीक्षक मगन पवार, पोलीस नाईक प्रवीण राठोड, चालक शेख हे पंचनामा करीत आहेत. तर या ट्रॅक्टरचे मालक हे मालेगाव येथीक असल्याची माहिती याच भागात असलेल्या दुसऱ्या ट्रॅक्टर चालकाकडून प्राप्त झाली आहे.
पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह ट्रॅक्टरच्या बाहेर काढला आहे. पोलीस आता मालकाच्या प्रतीक्षेत घटनास्थळी बसलेले आहेत. अजून तरी या प्रकरणी कोणतीही नोंद झालेली नाही. मात्र ट्रॅक्टरचे हेड उलटल्याने या परिसरात ट्रॅक्टर चालकमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.