हिंगोली -जिल्ह्यात तीन ते चार दिवसापासून पाऊस अधून मधून हजेरी लावत आहे. शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आणि, अचानक दुपारून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा होती, ती आता संपली असून आता पेरणीसाठी एकच घाई होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
यावर्षी मृर्ग नक्षत्र पूर्णत: कोरडे गेल्याने शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी चिंतातुर झाला होता. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मागील तीन ते चार दिवसापासून पाऊस हिंगोली जिल्ह्यातील काही भागात अधून मधून हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून शेतकरी पेरणीकडे वळले आहेत.