महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मी दिवाळी आनंदात साजरी करू शकलो नाही याची खंत, असे म्हणत वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न

दिवाळी असतानाही मी हा सण साजरा करू शकलो नाही याची मनात खंत आहे, असे म्हणत आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या हिंगोलीतील एका वाहकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रमेश टाळकुटे, असे या वाहकाचे नाव आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Nov 7, 2021, 5:14 PM IST

हिंगोली- दिवाळी असतानाही मी हा सण साजरा करू शकलो नाही याची मनात खंत आहे, असे म्हणत आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या हिंगोलीतील एका वाहकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रमेश टाळकुटे, असे या वाहकाचे नाव आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्याच धर्तीवर हिंगोली येथील बसस्थानकातही एसटी कर्मचारी उपोषणास बसले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी काही कर्मचारी टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशातच वाहक रमेश टाळकुटे यांनी आपल्या कुटुंबीयांना फोनद्वारे संपर्क साधून मी दिवाळी सण साजरा करू शकलो नाही याची मनात खंत असल्याचे सांगत त्यांनी फोन बंद केला.

त्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. अजून तरी या प्रकरणी कोणतीही नोंद झालेली नसली तरीही राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. रमेश टाळकुटे यांची नेमणूक कळमनुरी आगारात होती. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

हे ही वाचा -हृदयद्रावक : भाऊबीजेच्या पूर्वीच बहिण भावावर काळाचा घाला; जात होते मामाच्या गावी

ABOUT THE AUTHOR

...view details