हिंगोली -राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीला व्हॉट्सअॅप वर अश्लील संदेश पाठवणे दुसऱ्या एका जवानाच्या अंगलट आले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात त्या जवनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपी जवानाला ताब्यात घेतले आहे.
जवानाच्या पत्नीला व्हॉट्सअॅपवरून अश्लील संदेश पाठवने दुसऱ्या जवानाच्या अंगलट - राज्य राखीव पोलीस दल न्यूज
जवानाच्या पत्नीला व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश पाठवणे दुसऱ्या एका जवानाच्या अंगलट आले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात त्या जवनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सचिन मायंदळे असे ताब्यात घेतलेल्या जवानाचे नाव आहे. मायंदळे हा हिंगोली येथील राज्य राखीव दलात गट क्रमांक 12 मध्ये कार्यरत आहे. याच गटात कार्यरत असलेल्या दुसऱ्या जवानाच्या पत्नीला आरोपीने 26 नोव्हेंबरला पहाटेपासून 28 नोव्हेंबरच्यापर्यंत व्हॉट्सअॅपवरून अश्लील संदेश पाठवले.
हेही वाचा - पतीच्या आत्महत्येनंतर कुटुंबासाठी कंबर कसणाऱ्या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा - खासदार सुप्रिया सुळे
पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी मायंदळे याला ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेच्या मोबाईलमधील सिमकार्ड पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सय्यद हे करत आहेत.