हिंगोली - कोरोना काळामध्ये महिलांनी पुढाकार घेऊन विविध आघाड्यांवर कर्तृत्व सिद्ध केले आहे. हिंगोलीत डॉ.स्वाती गुंडेवार यांनी अन्य डॉक्टर, परिचारिका आणि कोरोना वॉर्डमधील इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन कोरोनाविरोधात लढ दिला.
कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी रुग्णांचे नातेवाईक वॉर्डात जाण्याचे टाळतात. मात्र डॉक्टर मोठ्या धीराने कर्तव्य बजावत आहेत. वसमत येथे मरकझवरून परतलेल्या रुग्णांचा स्वॅब घेण्याची जबाबदारी डॉ.स्वाती गुंडेवार यांच्यावर होती. त्यांनी कर्तव्य पार पाडले देखील. मात्र, रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने, पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे 15 दिवस अलगीकरण कक्षात रहावे लागले.
निवडक महिला डॉक्टरांवर 'ईटीव्ही भारत'चा विशेष रपोर्ट...कोरोना मर्दिनी! आता भीती नाहिशी झालीय
मनात वारंवार भीतीचे वादळ उठत होत, मात्र कशी-बशी यातून सावरले. आता कोरोना वॉर्डात कर्तव्य बजावत असताना भीती पूर्णपणे नाहीशी झाल्याचे डॉ. गुंडेवार सांगतात. मात्र कुटुंब अन् रुग्णसेवा करत असताना, तारेवरची कसरत करावी लागते. रुग्णालयातून गेल्यानंतर कपडे डेटॉलमध्ये टाकावे लागतात. हात पाय स्वच्छ करून आंघोळ केल्यानंतरच घरात काम करते. या कठीण प्रसंगात एकटे डॉक्टरच कर्तव्य बजावत नाहीत तर, आमच्याच खांद्याला खांदा लावून परिचारिका देखील कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देण्याचं काम करत आहेत.
डॉक्टर मोठ्या धीराने कर्तव्य बजावत आहेत. रुग्णालयातच नवरात्रोत्सव साजरा आम्ही जरी दिवस-रात्र कोरोना वार्डमध्ये राबत असलो तरीही, रुग्ण बरा झाल्यानंतर जो काही रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, तोच आमचा खरा विजय असतो. दुर्गा महोत्सवानिमित्त सर्वत्र घरोघरी पूजा अर्चा केली जाते. मात्र या ठिकाणी तर माझ्या सोबतच परिचारिका देखील रुग्णांची सेवा करण्यात व्यग्र आहेत.