हिंगोली- येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या कोव्हिड वार्ड परिसरात, वापरलेले मास्क आणि ग्लोज इतरत्र फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे रुग्णालय परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर दुसरी बाब म्हणजे, कोरोना बाधित रुग्णांना देण्यात येणारे भोजन देखील निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब समोर आली आहे. जेवणाचा दर्जा सुधारण्यासह परिसरात अस्ताव्यस्त फेकून दिलेले मास्क, ग्लोज गोळा करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक किशोर श्रीवास यांनी दिल्या आहेत.
कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना योध्ये दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र कोव्हिड वार्ड परिसरात फेकून देण्यात आलेल्या मास्क आणि ग्लोजमुळे परिसरात भिती निर्माण झाली आहे. आयुक्त हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची कल्पना असती तर कदाचित कोव्हिड वार्डमध्ये सर्व काही ठीक-ठाक करून ठेवण्यात आले असते. मात्र अचानक आयुक्ताने हिंगोली जिल्ह्याला दिलेल्या भेटीत रुग्णालयातील बिंग फुटले. परिसरात ठिकठिकाणी मास्क पडले होते. या सर्व प्रकाराने रुग्णालयातील साफ सफाईचे बिंग फुटले. त्यात कोरोना रुग्णास दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे होते हे समोर आले. त्यामुळे जेवणाचा दर्जा सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
धक्कादायक..! कोरोना वार्ड परिसरात वापरलेले मास्क, ग्लोज उघड्यावर फेकले - जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली
हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात असलेल्या कोव्हिड वार्ड परिसरात, वापरलेले मास्क आणि ग्लोज इतरत्र फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे रुग्णालय परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
धक्कादायक..! वापरलेले मास्क, ग्लोज कोरोना वार्ड परिसरात उघड्यावर फेकले