महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हिडीओ : हिंगोलीत रेशन दुकानदारचा मुजोरपणा; नियमानुसार धान्य देण्यास नकार - हिंगोली

गोरेगावच्या गांधीनगर भागातील रेशन दुकानदाराने एका लाभार्थ्याला या महिन्याच्या रेशनची पावती दिली. तर पुढील महिन्यात घेऊन जाण्यास सांगितले.

व्हायरल व्हिडीओ

By

Published : May 21, 2019, 3:23 PM IST

हिंगोली - गोरेगावच्या गांधीनगर भागातील रेशन दुकानदाराने एका लाभार्थ्याला या महिन्याच्या रेशनची पावती दिली. तर पुढील महिन्यात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर लाभार्थ्याने बाहेर बसलेल्या प्रतिष्ठित मंडळींनी ही गोष्ट सांगितल्यानंतर दुकानदाराला समजूत घालत धान्य देण्याची विनंती केली. मात्र, दुकानदार कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. या सर्व गोंधळाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओ

विठ्ठल मगर (गांधीनगर, गोरेगाव तालुका सेनगाव) हे या दुकानदाराकडे एक नव्हे तर 4 ठिकाणांच्या रेशन वाटप करण्याची परवानगी आहे. सोमवारी संजय गिरे हे लाभार्थी गोरेगाव येथील रेशन दुकानात धान्य आणण्यासाठी गेले. त्यावेळी दुकानदाराने त्यांचा ई- पॉस मशीनवर त्यांचा अंगठा घेतला. गिरे हे धान्य घेण्यासाठी ते पिशवी घेऊन समोर आले. त्यावेळी दुकानदाराने ही पावती घेऊन पुढीच्या महिन्यात धान्य घेण्यासाठी या, असे सांगितले. तेव्हा लाभार्थी गोंधळून गेला व त्यांने हा सर्व बाहेरील नागरिकांना सांगितला.

नागरिकांनी लाभार्थ्यांस नियमानुसार दुकानदारास धान्य देण्यास सांगितले. मात्र, दुकानदाराने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे हा प्रकार तलाठी अन मंडळ अधिकारी यांना सांगितला. त्यांनीही दुकानदाराला धान्य देण्यासाठी सांगितले. तरीही दुकानदार ऐकत नव्हता त्यावेळी शेवटी मंडळ अधिकाऱ्याने नायब तहसीलदार अशोक भोजने यांच्याशी फोनवरून संपर्क साधत सर्व प्रकार सांगितला. नायब तहसीलदारांनी दुकानदारास रेशन देण्याचे आदेश दिले. तरीही दुकानदार कोणाचे एक ऐकत नव्हता. तसेच तो मी तर रेशन देत नाही, तुम्हीच येऊन रेशन वाटप करा, असे तहसीलदारांना बोलत होता.

विशेष म्हणजे 4 महिन्यांपूर्वी लाभार्थ्यांच्या तक्रारीवरून या दुकांदाराची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली होती. मात्र, त्यामध्ये काहीच कारवाई झाली नाही. एवढेच नव्हे तर फोनवर खडाजंगी झालेले नायब तहसीलदार भोजने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुकानदाराच्या बोलण्याचीच सारवा-सारव केली. त्यामुळे आता याप्रकरणी जिल्हाधिकारी लक्ष घालणार का? आणि दुकानदारावर कोणती कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याने 11 नोव्हेंबर 2018 रोजी केलेल्या चौकशीत या दुकानांमध्ये अनियमिता आढळून आली होती. तसा अहवालच नागरिकांच्या समक्ष 6 महिन्यापूर्वी वरिष्ठाकडे पाठविला होता. मात्र, 6 महिने उलटूनही याप्रकरणी कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details