हिंगोली-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तू, सेवांच्या वाहतुकीला परवानगी दिली आहे. मात्र, याव्यतिरिक्त इतर वस्तू नेण्यासाठी कोण काय डोकं लावेल, याचा काही नेम नाही. अशाच एका बूट-चप्पल विक्रेत्याने औषधे वाहतूक करण्याच्या नावाखाली बूट अन् चपलांची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
जलद औषधे वाहतुकीच्या नावाखाली चक्क चप्पल आणि बुटांची वाहतूक..! - lockdown in india
जिल्ह्यातील वसमत येथे एका बूट विक्रेत्याने अनोखी शक्कल लढवून लॉकडाऊनच्या काळात सुरू असलेल्या अति जलद औषधांच्या वाहनाचा वापर केला. आत्तापर्यंत रुग्णवाहिकेतून दारू, पैसा आणि ट्रकमधून अंमली पदार्थांची वाहतूकही होत असल्याचे समोर आले आहे. मात्र, आज पहिल्यांदाच अतिजलद सेवेचा लाभ हा बूट अन् चपलांची वाहतूक करण्यासाठी झाल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील वसमत येथे एका बूट विक्रेत्याने अनोखी शक्कल लढवून लॉकडाऊनच्या काळात सुरू असलेल्या अति जलद औषधांच्या वाहनाचा वापर केला. आत्तापर्यंत रुग्णवाहिकेतून दारू, पैसा आणि ट्रकमधून अंमली पदार्थांची वाहतूकही होत असल्याचे समोर आले आहे. मात्र, आज पहिल्यांदाच अतिजलद सेवेचा वापर बूट अन् चपलांची वाहतूक करण्यासाठी झाल्याचे समोर आले आहे.
कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीच्या काळात प्रशासन खूपच सतर्क झाले आहे. एम. एच. 38 ई 222 ह्या नंबरच्या वाहनातून हे चप्पल अन् बुटांची पोती उतरवली जात होती... तेही दुपारच्या वेळी! हा प्रकार पाहून बरेच जण आवक झाले. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांतून चक्क बुटांची होणारी वाहतूक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या वाहनाची कशी तपासणी केली नसावी, याबद्दलही शंका उपस्थित केली जात आहे.