महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार संतोष बांगर यांची वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल

एका युवकाची दुचाकी वाहतूक शाखेच्या कर्मचारी ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली असता, त्या युवकाने थेट आमदार संतोष बांगर यांना फोनवरून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून आपल्यावर कारवाई होत असल्याची तक्रार केली. त्यावेळी बांगर यांनी त्या कर्मचाऱ्याकडे फोन देण्याची सूचना केली असता, कर्मचारी कारवाईत व्यस्त असल्याने, त्यांनी फोन उशिरा घेतला. त्यामुळे बांगर यांचा पारा चढला आणि फोन उशिरा घेणाऱ्य वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर अश्लील शिवीगाळ केली.

आमदार संतोष बांगर यांची वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ;
आमदार संतोष बांगर यांची वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ;

By

Published : Sep 29, 2021, 8:50 AM IST

Updated : Sep 29, 2021, 8:56 AM IST

हिंगोली- कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला फोनवरून शिवीगाळ केल्याच्या प्रकार एका व्हायरल ऑडिओ क्लिपमधून समोर आला आहे. सध्या पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या सूचनेनुसार वाहतूक शाखेचे पोलीस शहरातील चोऱ्याचे सत्र थांबवण्यासाठी विनानंबर वाहनांची कसून तपासणी करण्याची मोहीम राबवत आहेत. अशातच एका युवकाची दुचाकी थांबवून तपासणी करीत असताना, एका युवकाने कारवाई टाळण्यासाठी आमदार संतोष बांगर यांना फोन लावला. मात्र पोलीस कारवाईत व्यस्त असल्याने फोन घेण्यासाठी विलंब झाला. त्यानंतर आमदारांचा फोन म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांने फोन घेताच भडकलेल्या आमदार बांगर यांनी थेट अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यांच्या या संभाषणाची ऑडिओ क्लीप आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जनतेतून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

पोलीस अधीक्षक राकेश कलासागर
हिंगोली जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र हे वाढले होते. त्यामुळे वाहतूक शाखा पोलीस सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कसून तपासणी करीत आहेत. यामध्ये विना-नंबरच्या आणि कागदपत्रे नसलेल्या वाहनांवर कारवाई करत ती ताब्यात घेतली जात आहेत. तसेच त्यांच्या मूळ मालकाची चौकशी केली जात आहे. याच दरम्यान एका युवकाची दुचाकी वाहतूक शाखेच्या कर्मचारी ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली असता, त्या युवकाने थेट आमदार संतोष बांगर यांना फोनवरून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून आपल्यावर कारवाई होत असल्याची तक्रार केली. त्यावेळी बांगर यांनी त्या कर्मचाऱ्याकडे फोन देण्याची सूचना केली असता, कर्मचारी कारवाईत व्यस्त असल्याने, त्यांनी फोन उशिरा घेतला. त्यामुळे बांगर यांचा पारा चढला आणि फोन उशिरा घेणाऱ्य वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर अश्लील शिवीगाळ केली. बांगर करतात नेहमीच वादग्रस्त विधाने-आमदार संतोष बांगर हे नेहमीच त्यांच्या विधानाने चर्चेत राहतात. मागे देखील काही दिवसापूर्वी त्यांनी नारायण राणे यांच्या संदर्भात कोथळा बाहेर काढण्याची भाषा वापरली होती. त्यानंतर आता एका वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता या ऑडिओ क्लिप वरून पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक-आमदार संतोष बांगर यांनी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना फोनवरून ती केलेल्या शिवीगाळीचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आता चांगलीच आक्रमक झाली आहे. दुचाकीवर नंबर न टाकचा चालवणे, शिवाय त्या प्रकरणी कारवाई करणाऱ्यांवर अशा प्रकारे लोकप्रतिनींधीकडून शिवीगाळ केली जात असल्याने आमदार बांगर यांच्या कृतीचा महाराष्ट्र पोलीस बाय संघटनेने निषेध व्यक्त केला.

त्या ऑडिओ क्लीपमधील संभाषण पोलीस कर्मचाऱ्यासोबत नाही- पोलीस अधीक्षक राकेश कलासागर

बांगर यांच्या शिवीगाळीची जी ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. ती घटना दोन तीन महिन्यांपूर्वी घडलेली असावी, मात्र बांगर यांनी शिवीगाळ केलेली व्यक्ती वाहतूक पोलीस विभागाची नाही. अशा प्रकारची कुठलीही तक्रार नोंद नाही. ते संभाषण एका दुचाकी आणि कार चालकामध्ये वाद निर्माण झाल्यानंतर आमदारांनी शिवीगाळ केल्याच्या प्रकरणातील आहे. जर संबंधित व्यक्तीने या प्रकरणी तक्रार केली तर आम्ही निश्चित कारवाई करू अशी प्रतिक्रियापोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - पोलीस संरक्षण काढा, राणेंचा घरात घुसून कोथळा बाहेर काढतो; आमदार संतोष बांगर यांचं वादग्रस्त वक्तव्य

हेही वाचा -आमदार असावा तर असा.. जनतेच्या सेवेसाठी मोडली स्वतःची 90 लाखांची एफडी

Last Updated : Sep 29, 2021, 8:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details