महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत रमजानसह बुद्ध पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी, शहरात 'हे' कलम लागू - corona cases in hingoli

संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात 30 एप्रिलला 6 वाजल्यापासून ते 14 मे 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार, शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाही.

शहरात 'हे' नियम लागू
शहरात 'हे' नियम लागू

By

Published : Apr 30, 2020, 10:23 AM IST

हिंगोली- रमजान महिना 25 एप्रिलपासून सुरू झाला आहे. तर, 7 मे रोजी बुद्ध पोर्णिमा आहे. अशात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त सुरू आहे. या सण उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अधिनियम 1951 च्या कलम 37 (1)(3) चे आदेश लागू करण्यात येत आहेत.

संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात 30 एप्रिलला 6 वाजल्यापासून ते 14 मे 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार, शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाही. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्ये जवळ बाळगणार नाहीत.

दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही. आवेशी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाहीत. व्यक्ती किंवा समुहाच्या भावना दुखावतील या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत.

यासोबतच पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांना विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. तसेच विशेषरित्या परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकारी यांना राहतील, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी सूर्यवंशी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details