महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हट्टा येथील शाळेची करणार चौकशी - शिक्षणाधिकारी सोनटक्के - BO

आजही ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेवरील विश्वासार्हता कायम आहे. मात्र, काही शिक्षक ही विश्वासार्हता गमावून बसवत असल्याचे हट्टा येथील प्रकरणावरून समोर आले आहे.

हट्टा येथील शाळेची करणार चौकशी - शिक्षणाधिकारी सोनटक्के

By

Published : Jun 20, 2019, 11:24 AM IST

हिंगोली -जिल्ह्यातील हट्टा येथील केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेत, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिंनीला फरशी पुसायला जुंपल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. या प्रकारानी पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. शिक्षण अधिकाऱ्याने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. बीओ मार्फत या शाळेची चौकशी करणार असल्याचे शिक्षण धिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी 'ईटिव्ही' शी बोलताना सांगितले.

हट्टा येथील शाळेची करणार चौकशी - शिक्षणाधिकारी सोनटक्के

आजही ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेवरील विश्वासार्हता कायम आहे. मात्र, काही शिक्षक ही विश्वासार्हता गमावून बसवत असल्याचे हट्टा येथील प्रकरणावरून समोर आले आहे. मोठ्या विश्वासाने जिल्हा परिषद शाळेत पाठवलेल्या विद्यार्थिनी कडून शिक्षक वर्ग खुशाल शाळेची साफसफाई करून घेत असल्याचे उघड झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हा प्रश्न केवळ एकाच शाळेचा नसून अनेक शाळेत हीच स्थिती असल्याची गंभीर बाब आहे. मात्र, शिक्षक ही बाब टाळून नेण्यासाठी 'आम्ही सर्वच जण स्वयंस्फूर्तीने शाळा स्वच्छ करत असल्याचे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक काळे यांनी सांगितले. वास्तविक पाहता या शाळेवर सेवकच नसल्याने हीच स्थिती शाळेची देखील आहे. जिल्ह्यात बऱ्याच शाळा या सेवकाविना असल्याने त्या ठिकाणी खाजगी सेवकाची शिक्षकाकडून व्यवस्था केलेली आहे. मात्र, बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यानाच राबवून घेत असल्याचे खळबळजनक प्रकार घडत होत आहेत.

आता हट्टा येथील प्रकरणाची शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी गंभीर दखल घेत बीओ मार्फत चौकक्षी करणार आहेत. चौकशीत दोषी आढळल्यास विद्यार्थिनींना राबवणाऱ्या शिक्षक किंवा शिक्षिकेवर कडक कारवाई करणार असल्याचे सोनटक्के यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details