हिंगोली -जिल्ह्यातील वसमत सुवर्णकार कॉलनीमध्ये डॉक्टर असलेल्या पत्नीच्या दागिन्यांवर डॉक्टर असलेल्या पतीने हात साफ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन डॉक्टर पती विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
स्वतःच्याच घरात चोरी करुन डॉक्टर पतीने आपल्या पत्नीचे पळविले दागिने - हिंगोली चोरी
आरोपी डॉक्टर पतीने, डॉक्टर पत्नीच्या घरातून चार तोळे सोन्याच्या चार बांगड्या, पाच ग्रॅमची अंगठी व रोख रक्कम दहा हजार असा एकूण तब्बल 1 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
चंद्रकांत तमेवार असे आरोपी पतीचे नाव आहे. वसमत शहरातील सुवर्णकार कॉलनी परिसरात राहणाऱ्या मनीषा तमेवार यांच्या घरात हा आश्चर्यकारक चोरीचा प्रकार घडला आहे. मनीषा आणि त्यांचे पती चंद्रकांत यांच्यामध्ये नेहमीच वाद होत असल्याने, एकच घरात तळमजला आणि वरील मजल्यावर असे वेगवेगळे राहत होते. मनीषा या बाहेर गावी गेल्या होत्या, त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा त्यांच्या घराची कडी कोंडे तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे त्यांनी याची चौकशी केली असता, त्यांच्याच पतीने हॉस्पिटलमधून घरात प्रवेश करत चोरी केल्याची त्यांना माहिती मिळाली.
आरोपी पतीने, पत्नीच्या घरातून चार तोळे सोन्याच्या चार बांगड्या, पाच ग्रॅमची अंगठी व रोख रक्कम दहा हजार असा एकूण तब्बल 1 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला असल्याची तक्रार मनीषा यांनी वसमत शहर पोलिसात दिल्याने, पोलिसांनी चोरट्या पती विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिली.
हेही वाचा -ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: भोगावती नदी वाळूप्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र, अहवालात गौडबंगाल