हिंगोली - गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात वाटमारींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. चोरटे एवढे सक्रिय झाले आहेत की, ते नेहमीच वेगवेगळा फंडा वापरून वाटसरूंना गंडवत आहेत. अशीच एक घटना कनेरगाव नाका येथे घडली आहे. येथे एका सेवानिवृत्त शिक्षकास चोरट्याने आपण सीआयडी असल्याचे भासवून बोटातील अंगठी काढून पोबारा केल्याचा प्रकार घडला आहे.
कान्होजी अर्जुनराव काळदाते कान्होजी अर्जुनराव काळदाते, असे फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांचे नाव आहे. काळदाते ६ फेब्रुवारी रोजी रस्त्याने चालत जात असताना, त्यांना एका अनोळखी व्यक्तीने हात दिला आणि समोरील व्यक्ती आवाज देत आल्याचे सांगितले. त्यामुळे काळदाते समोर उभ्या असलेल्या व्यक्तीजवळ गेले. मात्र सोबतच आलेल्या अनोळखी व्यक्तीने समोर थांवलेल्या व्यक्तीची तपासणी करण्यास सुरुवात करून, काळदाते यांचीदेखील तपासणी करण्यास सुरुवात केली. काळदाते विरोध करत होते, परंतु आपण सीआयडी असल्याचे सांगत एका खून प्रकरणात संशयितांची तपासणी करीत आहोत, असे म्हणाला. त्यामुळे काळदाते यांनीही त्याला तपासनी करू दिली.
यावेळी तपासणी करताना आपण सोन्याच्या अंगठ्या का घालता? असे घालून फिरत जाऊ नका, असे म्हणून त्याने काळदाते यांची अंगठी घेतली, उभे असलेल्या व्यक्तीच्या हातात दिली. अन त्या व्यक्तीने एका कागदात अंगठी गुंडाळून दिल्याचे भासवत तो कागद काळदातेकडे टोपीत गुंडाळून दिला. अन वरून कागद घरी जाऊन उघडण्याचा सल्ला ही दिला. नेहमीच टोपी घालून फिरणारे काळदाते टोपी घालण्यासाठी प्रयत्न करू लागले. तर टोपी घालता घालता कागदातील अंगठी खिशात ठेऊन देऊ असे म्हणत त्यानी कागद उघडून पाहिला. तेव्हा त्यात अंगठी नसून चक्क खडा असल्याचे त्यांना दिसून आले.
त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी नातवाला सोबत घेऊन चोरटे पळालेल्या दिशेने पाठलाग केला. मात्र, चोरटे सापडले नाही. शिक्षक तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस चोकीत गेले. मात्र, तेथे एका आरोपी सारखीच त्यांची कसून चोकशी केली जात होती. तर काही पोलीस कर्मचारी वय झाल्यावर कशाला अंगठ्या घालता असा सल्लाही देत होते.
काळदाते पोलिसांना तक्रार दाखल करून घेण्यासाठी विनवण्या करीत होते. यानंतर संबंधित पोलिसांनी सहा दिवसांनंतर गुन्हा दाखल केला. मात्र, आतापर्यंत याप्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात न आल्याचा आरोप काळदाते यांनी केला आहे. विशेष करून गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत लुटमारीच्या सर्वाधिक घटना घडत आहेत. चोरटे कधी वाहने अडवून तर कधी वाटसरूला लिफ्ट देऊन फसवणूक करत आहेत. मात्र अद्याप एकही चोरटा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.