हिंगोली - काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी हिंगोलीत बैठक घेण्यात आली. काँग्रेस नेते राजीव सातव आणि उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पाडली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मनोगत व्यक्त करण्यास सांगितले. यावेळी एका कार्यकर्त्याने निवडणूक काळात नियोजन करण्यासंबंधी थेट वानखेडेंनाच सल्ला दिला. निवडणूक काळात 'ढाब्या'वर कशाप्रकारे 'नियोजन' करायचे हे त्याने सांगितले. त्याच्या या सल्ल्यामुळे सातव आणि वानखेडेंची मात्र चांगलीच गोची झालेली पहायला मिळाली.
ढाब्याचे नियोजन करा ! कार्यकर्त्याच्या सल्ल्याने सातवांसह वानखेडेंची गोची - हिंगोली
निवडणुकीच्या नियोजनासाठी राजीव सातव मार्गदर्शन करणार होते. त्याआधी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करावे असे ठरले. तेव्हा संतोष गोरे नामक कार्यकर्ता उठला. त्याने मागच्या निवडणुकीत राजीव सातव यांनी कशा प्रकारे नियोजन केले होते ते सांगायला सुरुवात केली. यावेळी त्याने वानखेडेंनाच खडे बोल सुनावले.
निवडणुकीच्या नियोजनासाठी राजीव सातव मार्गदर्शन करणार होते. त्याआधी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करावे असे ठरले. तेव्हा संतोष गोरे नामक कार्यकर्ता उठला. त्याने मागच्या निवडणुकीत राजीव सातव यांनी कशा प्रकारे नियोजन केले होते ते सांगायला सुरुवात केली. यावेळी त्याने वानखेडेंनाच खडे बोल सुनावले. तसेच, मागच्या वेळी कार्यकर्त्यांसाठी दारुच्या बॉक्सची व्यवस्था कशी करण्यात आली होती, हे त्याने सांगितले आणि उपस्थित नेत्यांची गोची झाली.
कार्यकर्ता एवढ्यावरच थांबला नाही, तर कार्यकर्त्यांसाठी ढाब्यावर नियोजन लावण्यासंबंधी सांगू लागला. कार्यकर्त्याचा उत्साह फारच वाढल्याचे दिसताच सातव अस्वस्थ झाले. लोकांमध्ये चुकीचा संदेश जात आहे हे पाहून सातव यांनी त्याला थांबण्याची सूचना केली. पण, तोपर्यंत कार्यकर्ता सगळे बोलून गेला होता. या भाषणाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगत आहे.