हिंगोलीमध्ये एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय - रस्ते अपघात
हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने एक दिवसाची विश्रांती घेतली होती. मात्र आज (गुरुवार) पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मात्र जिल्ह्यातून वाहणाऱ्या कयाधू नदी पत्रातील पाणीसाठ्यामध्ये अजून वाढ झालेली नाही.
हिंगोलीमध्ये एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे
हिंगोली - एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने जिल्ह्यात पुन्हा जोरदार हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून संततधार सुरू होती. आत्तापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या 26.40 टक्के पावसाची नोंद झाली आहे.