हिंगोली- वसमत येथे नेहमीच मारहाणीच्या घटना घडत असतात. त्यामुळे या ठिकाणी नोकरवर्ग जीव मुठीत घेऊनच वास्तव्य करतो. यातच एका बसच्या वाहकास प्रवाशाला जागेवर जाऊन बस म्हणणे देखील भोवले आहे. बसमधील प्रवाशाने थेट वाहकाशी धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बसचालक अन वाहकाने पोलीस ठाणे गाठत त्या प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हिंगोली: प्रवाशाला खुर्चीवर बस म्हणणे वाहकास भोवले
हिंगोलीत एक प्रवासी बसमध्ये चालकाच्या बाजुला असलेल्या बोनट वर बसला होता. त्यामुळे वाहकाने त्या प्रवाशाला मागे खुर्च्या रिकाम्या आहेत म्हणून मागे जाऊन बसण्यास सांगितले. प्रवासी उठून मागे बसण्यासाठी गेला मात्र, वाहक तिकीट काढण्यासाठी त्या प्रवाशाजवळ गेले असता त्या प्रवाशाने अचानक वाहकाला धक्काबुक्की करत बस काय तुझ्या बापाची आहे का? अशी अरेरावी करून थेट मारहाण करण्यास सुरुवात केली.
नागोराव किसन डुकरे (वाहक क्रमांक 4611) असे वाहकाचे नाव असून, ते ओंढा ते वसमत मार्गे जाणाऱ्या एम.एच. 14 बी.टी. 1960 या क्रमांकाच्या बसवर वाहक म्हणून कर्तव्यावर होते. दरम्यान, एक प्रवासी बसमध्ये चालकाच्या बाजूला असलेल्या बोनट वर बसला होता. त्यामुळे वाहक डुकरे यांनी त्या प्रवाशाला मागे खुर्च्या रिकाम्या आहेत म्हणून मागे जाऊन बसण्यास सांगितले. प्रवासी उठून मागे बसण्यासाठी गेला. मात्र वाहक तिकीट काढण्यासाठी त्या प्रवाशाजवळ गेले असता त्या प्रवाशाने अचानक वाहकाला धक्काबुक्की करत बस काय तुझ्या बापाची आहे का? अशी अरेरावी करून थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्याने एकच गोंधळ उडाला. त्या प्रवाशाला अनेक जण समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो प्रवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे चालक आणि वाहकाने थेट पोलीस ठाणे गाठून त्या प्रवाशाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
TAGGED:
crime in hingoli