महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसच्या सातवांचे तळ्यात मळ्यात तर, शिवेनेवर उमेदवार शोधण्याची वेळ - congress hingoli

राजीव सातवांना कडवी झुंज देणारा उमेदवारच अख्या लोकसभा मतदार संघात अजून मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेनेकडे जागा असतानाही उमेदवार निश्चितिसाठी उशीर का? याची चर्चा हिंगोली मतदारसंघात जोरदार रंगत आहे.

जिल्ह्यातील मात्तबर नेते

By

Published : Mar 16, 2019, 11:03 AM IST

हिंगोली- लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले अतानाही हिंगोली मतदार संघात बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार सोडला तर कोणत्याच पक्षाचे उमेदवाराचे नाव जाहीर झालेले नाही. त्यातच काँग्रेसचे राजीव सातव यांचे तळ्यात मळ्यात आहे. यातच शिवसेनेला जागा निश्चित असतानाही राजीव सातवांना कडवी झुंज देणारा उमेदवारच अख्या लोकसभा मतदार संघात अजून मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेनेकडे जागा असतानाही उमेदवार निश्चितिसाठी उशीर का? याची चर्चा हिंगोली मतदारसंघात जोरदार रंगत आहे.

हिंगोली लोकसभा निवडणुकीकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनेकडे सातवांना झुंज देणारा नेता शोधून सापडलेला नसताना, भाजपकडे सातवांना झुंज देणाऱ्या माजी मंत्री सूर्यकांत पाटील, माजी खासदार, वकील, त्याचबरोबर माहूर गडाचे योगी शाम भारती असे दिगग्ज आहेत. विशेष म्हणजे या मतदार संघात सिंचन वगळता, रस्ते, वीजपुरवठा ही कामे झाली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना? भाजपसाठी हिंगोली लोकसभा मतदार संघात अनुकूल वातावरण आहे. मात्र, युतीत जागाच शिवसेनेला सुटल्याने शिवसेनेने मोठा अहट्टास धरलेला आहे.


हिंगोली मतदारसंघात काँग्रेसचे राजीव सातव यांनी किती विकास कामे केली, तसेच कोणत्या मतदारांच्या भेटी घेतल्या हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे सातव यांच्यावर गुजरात प्रभारी पदाची जबाबदरी दिल्यानंतर त्यांची मतदार संघातील पकड हळूहळू कमी कमी होत चालली आहे. त्यामुळेच सातव याना त्यांच्याच बालेकिल्ल्यात तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावक यांच्यासोबत सातवांचे सबंध सर्वश्रुत आहेत.


मागील काळात तर स्थानिक संस्थेच्या निवडणुका पाहता नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्ये तर शिवसेनेने काँग्रेसला धूळ चारली आहे. तर औंढा नागनाथ नगरपालिकेमध्ये शिवसेना-भाजप विराजमान आहे. सेनगाव अन हिंगोली आघाडीच्या ताब्यात असली तरीही माजी आ. भाऊराव पाटील यांचाच बोलबाला आहे. एकंदरीत जिल्ह्यात शिवसेनेचे स्थानिक स्वराज्य संस्थेवर दबदबा आहे. मात्र, जिल्ह्याचे मीनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत काँगेस-राष्ट्रवादी सोबत सत्तेसाठी केलेली अभद्र युती अन आलबेल कारभार जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे.

शिवसेना महिला सदस्यांच्या पतीने एका अधिकाऱ्याला केलेली मारहाण आणि काँग्रेसचे आमदार डॉ. संतोष टारफे यांच्या खाजगी स्वीय सहायकास केलेली मारहाण या दोन घटना अजून ही जनतेच्या लक्षात आहेत. वसमतचे शिवसेना आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा यांची मागील काळात जि.प च्या कारभरातील हस्तक्षेप ही चांगलाच महागात पडणार आहे. सध्या तरी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेत दोन गट पडल्याचे पहावयास मिळते. एक गट पत्रकार परिषदा घेऊन हिंगोलीचाच उमेदवार अन्यथा बंडखोरीची भाषा बोलत आहे. तर दुसरा गट मात्र, माजी खासदार सुभाष वनखेडे यांच्या समर्थनात मातोश्री पर्यंत लॉबिंग करीत असल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे.
यातच लोकसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या एका बंजारा नेत्याला एका महामंडळाचे पद देऊन चुडीचूप केले आहे. एवढी परिस्थिती असूनही शिवसेनेला अद्याप सातवासारख्या मात्तबराला टक्क देण्यासाठी सक्षम उमेदवारच भेटला नाही का? याची जोरदार चर्चा होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details