हिंगोली - औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
महिला पोलीस कर्मचाऱ्यावर पोलिसाचाच अत्याचार; हिंगोलीतील धक्कादायक प्रकार - औंढा नागनाथ
औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्यात कार्यरत आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
यामुळे संबंधित महिला गर्भवती राहिली असून, नंतर तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. कर्मचारी महिलेच्या फिर्यादीवरून वसमत येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खळबळजनक प्रकारामुळे पोलीसच असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.
मुनीर इब्राहिम मुन्नीवाले असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, तो मागील चार वर्षांपासून पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत होता. तसेच आरोपी या महिलेला सतत शिवीगाळ करत असल्याची फिर्यादीत नोंद आहे.
अनेकदा महिलेने लग्नाची मागणी केल्यावर आरोपी वारंवार टाळाटाळ करून महिलेची दिशाभूल करत होता. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. उपअधीक्षक सतीश देशमुख या घटनेचा पुढील तपास करत आहेत.