हिंगोली- जिल्ह्यातील औंढा नागनाथ पोलीस ठाणे हद्दीतील रामेश्वर शिवारात २ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारत ७ जुगाऱ्यांना जुगार खेळताना रंगेहात पकडले. जुगाऱ्यांकडून जुगार साहित्य, दुचाकी, मोबाईल असा ४ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे यातील काही जुगारी प्रतिष्ठित घरातील आहेत. या प्रकरणी ओंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपींकडून ३९ हजार ६७० रुपये रोख तर ३ लाख रुपये किमतीच्या ६ दुचाकी, ८३ हजार रुपये किमतीचे ९ मोबाईल असा एकूण ४ लाख २२ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जुगार साहित्यासह जप्त केला आहे. या गुन्ह्यात शिवाजी यादवराव (दाभाडे रा. आडगाव), (भारत सुभाष दळवे, रा. जिंतूर), दिनकर मारोतराव ईगारे (रा. लंडाळा, जि. हिंगोली), गुणाजी गणपतराव फोपसे, (रा. गंगापूर जिंतूर), मधुकर भीमराव कदम (रा. बोर्डी, जि. परभणी), विजूशेठ देशमुख ( रा. रामेश्वरतांडा जि. हिंगोली), सचिन फकीरराव इंगोले (रा. लांडाळा जि. हिंगोली) या व इतर आठ आरोपींचा समावेश आहे.