हिंगोली-जिल्ह्यातील कळमनुरी येथे स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवादविरोधी कक्ष यांनी छापा टाकून पाच तलवारी जप्त केल्या आहेत. त्यातील एक तलवार चांदीची आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सराईत गुन्हेगार पाच तलवारीसह अटकेत; एक तलवार चांदीची - hongoli police news
एक तलवार ही चांदीची असून तिचे वजन 500 ग्रॅम आहे. बाजार भावानुसार या तलवारीची किंमत 24 हजार रुपये आहे. आरोपीने ही तलवार मंदिरातून किंवा धार्मिक स्थळातून चोरली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा-CAA Protest: दिल्लीतील शाहीन बाग परिसरात 'जेल भरो' आंदोलनाला सुरुवात
सुनील सिंग गुलाब सिंग बावरी, असे आरोपीचे नाव आहे. कळमनुरी येथील इंदिरानगर झोपडपट्टी भागातील सुनील सिंग याच्या घरामध्ये तलवारी असून तो एखादा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर व पथकाने छापा टाकला. यात पाच विनापरवाना वापरात असलेल्या तलवारी आढळल्या. त्यापैकी एक तलवार ही चांदीची असून तिचे वजन 500 ग्रॅम आहे. बाजार भावानुसार या तलवारीची किंमत 24 हजार रुपये आहे. आरोपीने ही तलवार मंदिरातून किंवा धार्मिक स्थळातून चोरली असावी, असा संशयपोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर घरफोडीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.