हिंगोली-जिल्ह्यात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अनेक जणांना रस्त्यावरील अडथळ्यामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. हीच मुख्य अडचण लक्षात घेता पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशानुसार हट्टा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या जिंतूर टी पॉइंट ते नॅशनल धाब्या या वळणावरील धोकादायक झाडे झुडपे बुडापासून छाटून टाकण्यात आली आहेत. पोलीस प्रशासनाच्या या निर्णयामुळे येथील अपघाताला आळा बसण्यास मदत होणार आहे.
हिंगोली पोलीस प्रशासनाने हटवले 'त्या' अपघाती वळणावरील झाडेझुडपे - hingoli police news
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशानुसार हट्टा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या जिंतूर टी पॉइंट ते नॅशनल धाब्या या वळणावरील धोकादायक झाडेझुडपे बुडापासून छाटून टाकण्यात आली आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील रस्त्यावर अपघाताच्या मालिका काही केल्या कमी होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. रस्त्यावर जागो जागी अडथळे निर्माण झालेले असल्याने समोरील वाहन दिसत नसल्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. जिंतूर टी पॉइंट ते नॅशनल धाबा या वळणावर असलेल्या झाडा झुडपामुळे समोरून येणाऱ्या वाहन चालकाला वाहनांचा अंदाज येण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात घडत होते. ही बाब पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या लक्षात येताच त्यांनी येथील अडथळे काढून घेण्याच्या सूचना हट्टा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार जेसीबीच्या साहायाने या वळणावरील वाढलेली झाडे झुपडपे तोडण्यात आली.