महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता रस्त्यावर दुचाकी पार्क करणे ठरणार महाग, हिंगोलीत ४ ते ५ हजार जणांवर कारवाई

हल्ली रस्त्यावर आडव्या-तिडव्या दुचाकी उभ्या करून निघून जाण्याची सवय दुचाकी चालकांच्या चांगलीच अंगवळणी पडली आहे. मात्र, ही सवय आता अंगलट येणार आहे. वाहतूक शाखेने नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीवर ई - चलनद्वारे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

हिंगोलीत ४ ते ५ हजार दुचाकीवर कारवाई

By

Published : Jul 7, 2019, 10:34 AM IST

हिंगोली - हल्ली रस्त्यावर आडव्या-तिडव्या दुचाकी उभ्या करून निघून जाण्याची सवय दुचाकी चालकांच्या चांगलीच अंगवळणी पडली आहे. मात्र, ही सवय आता अंगलट येणार आहे. हिंगोलीत वाहतूक शाखेने नो पार्कींगमध्ये लावलेल्या दुचाकीवर ई - चलनाद्वारे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

आतापर्यंत 4 ते 5 हजार दुचाकीवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील 10 ते 15 दुचाकीवर ३ पेक्षा जास्त वेळा कारवाई करण्यात आली आहे. या दुचाकींचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे.

हिंगोलीत ४ ते ५ हजार दुचाकीवर कारवाई

हिंगोली शहर वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नवनवीन फंडे अवलंबले जात आहेत. याचा परिणाम वाहन चालकांवर होत असून, काहीजण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जतदेखील घालताना दिसतात. यावरही वाहतूक शाखेने पर्याय काढला असून, कारवाईसाठी सज्ज असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या शर्टवर डिजिटल कॅमेरा बसवला आहे. त्यामुळे तुमची प्रत्येक कृती कॅमेऱ्यात कैद होणार आहे.


नियमित कारवाई सुरु झाल्याने, हळूहळू वाहन चालकांना शिस्त लागण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, हिंगोली शहरात कुठेही पालिकेचे अधिकृत वाहनतळ नसल्याने, वाहन धारकांची मोठी पंचायत होऊन बसली आहे. अशाच परिस्थितीत वाहतूक शाखेने ई - चलनाद्वारे कारवाई करण्यास सुरुवात केल्याने हिंगोलीकरांना दुहेरी फटका सहन करावा लागणार आहे. ई-चलन कारवाई अजब असून, नो पार्किंगमध्ये लावलेल्या आपल्या दुचाकीवर कारवाई झाली की नाही, हे कळतदेखील नाही. थेट घरपोच कारवाई झाल्याचे पत्र येत असून, ३ पेक्षा जास्त वेळा कारवाई झाली तर परवानादेखील रद्द केला जाऊ शकतो.

एखाद्या ठिकाणी नो-पार्किंगमध्ये दुचाकी उभी केली तर ई-चलन यंत्राद्वारे तिचा फोटो काढून, त्यामध्ये सबंधित दुचाकीचा नंबर समाविष्ट केला जातो. परत कधी हीच गाडी आढळली तर त्या गाडीचा नंबर ई चलनामध्ये असतोच. ही प्रक्रिया ४ वेळा झाली तर आपला परवाना रद्द करण्यासाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविला जातो. आतापर्यंत हिंगोलीत करण्यात आलेल्या 4 ते 5 हजार कारवाई मध्ये 15 जणांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याची माहिती वाहतूक शाखेचे पो. नि. ओकांत चिंचोळकर यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details