हिंगोली - शासनाच्या प्रत्येक योजनेसाठी आधार हे सक्तीचे झाले आहे. आधार केवळ हे योजनेसाठीचा नव्हे तर शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी देखील आवश्यक आहे. त्यामुळे पालकांची आधारकार्ड काढण्यासाठी चांगलीच धांदल उडाल्याचे सध्या दिसून येत आहे. पूर्वी महा-ई केंद्रावर मिळणारे आधार बंद करून, ते बँका किंवा पोस्टातच उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांना हातची सर्व कामे सोडून आधार कार्ड काढण्यासाठी शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे बँकेत रांगा लागत आहेत.
आधार काढण्यासाठी हिंगोलीत नागरिकांची तारांबळ; बँके बाहेर लागतात रांगा - Hingoli
नागरिकांची आधारकार्ड काढण्यासाठी चांगलीच धांदल उडाल्याचे सध्या दिसून येत आहे. पूर्वी महा-ई केंद्रावर मिळणारे आधार बंद करून, ते बँका किंवा पोस्टातच उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांना हातची सर्व कामे सोडून आधार कार्ड काढण्यासाठी शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे बँकेत रांगा लागत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत आधार मानवाचा आधार बनला आहे. आधार नाही तर काहीच नाही, अशी काहीशी सध्याची परिस्थिती झाली आहे. शासनाच्या योजनांचा लाभ आधार शिवाय मिळतच नाही. मुख्य ओळखीचा पुरावा हा आधार असल्याने, ते काढून घेण्यासाठी नागरिक एवढे बेजार होत आहेत. 30 ते 40 किलोमीटर अंतरावरून हिंगोली येथे ग्रामस्थ आधार कार्ड काढण्यासाठी येत आहेत. सध्या हिंगोली जिल्ह्यात आधार कार्ड हे पोस्ट ऑफिस अन् काही बँकेत काढले जात आहे. मात्र बँकेत ज्या केंद्रचालकांना आधार कार्ड काढण्याचा कंत्राट दिले आहे. ते नागरिकांना खालच्या दर्जाची वागणूक देत आहेत. या प्रकाराकडे बँक व्यवस्थापक दुर्लक्ष करीत आहेत. शहरातील युनियन बँकेत आधार किट प्रवेश द्वाराजवळ ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी होते आहे.