महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रुग्णाच्या मृत्यूची माहिती उशिराने दिल्याचा नातेवाईकांचा आरोप, रुग्णालयात गोंधळ - प्रकृती

पेडगाववाडी येथील संभानाथ शिंदे यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

रुग्णाच्या मृत्यूची माहिती उशिराने दिल्याचा नातेवाईकांचा आरोप, रुग्णालयात गोंधळ

By

Published : Apr 30, 2019, 3:23 PM IST

हिंगोली- जिल्ह्यातील पेडगाववाडी येथील संभानाथ शिंदे यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे काही प्रतिसाद न मिळाल्याने संभानाथ यांना हिंगोलीतील जगदंबा या खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाचा मृत्यू सकाळी होऊनही डॉक्टरानी वेळेत न सांगितल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गोंधळ घातला.

रुग्णाच्या मृत्यूची माहिती उशिराने दिल्याचा नातेवाईकांचा आरोप, रुग्णालयात गोंधळ


हिंगोली जिल्ह्यातील पेडगाववाडी येथील संभानाथ शिंदे यांना रात्रीपासून 'चक्कर' येत असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. तेव्हा डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईला नांदेडला घेऊन जाण्यास सांगितले. मात्र नातेवाईकांनी संभानाथ यांना नांदेडला घेऊन जाण्याऐवजी जगदंब या खाजगी रुग्णालयात दाखल केले.


जगदंब या खासगी रुग्णालयात संभानाथ यांच्यावर उपचार सुरू होते. तेव्हा त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर उशिराने आम्हाला डॉक्टरानी सांगितले. असा आरोप मुलगा अजय संभानाथ शिंदे याने केला आहे. त्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर गोंधळ घालत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. काही वेळानंतर डॉक्टरांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details