महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशाचा चौकीदार बनणे यात  चुकीचे काय? - पंकजा मुंडे - चौकीदार

पंकडा मुंडे हिंगोली येथील भाजपचे लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या.

पंकजा मुंडे

By

Published : Apr 8, 2019, 10:09 AM IST

हिंगोली - नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघितले अन् त्यांनी प्रत्यक्षात उतरविलेही. पंतप्रधान काय गांधी घराण्यातील लोकांनीच व्हायचे का? सर्वसामान्यातीलही पंतप्रधान होऊ शकतो हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आहे. त्यामुळे 'चाय बेचनेवालाही प्रधानमंत्री बन सकता है' हे माझ्या राज्यातील माय माऊल्यांनी दाखवून दिल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या हिंगोली येथील भाजपचे लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या.

हिंगोली येथील भाजपचे लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे

यावेळी पंकजा मंडे म्हणाल्या की, हिंगोलीचे लोक हे एकनिष्ठ असल्याने हिंगोली येथे माझ्या सभेची गरज नाही. येथील लोक त्यांच्या ताईचा अजिबात अपमान करणार नाहीत. विशेष म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसासाठी गोपीनाथ मुंडे यांनी काम केले आहे. मग पक्षासाठी सतरंज्या उचलणाऱ्या उमेदवाराला हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमेवारी दिली असेल तर मग वावगे काय आहे, असे म्हणत त्यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीचे समर्थन केले.

काँग्रेसवर टिका करताना मुंडे म्हणाल्या की, सत्तेत आल्यानंतर देशद्रोहाचा गुन्हा रद्द करणार आहोत, असे काँग्रेस सांगत आहे. मग काय तुम्हाला रस्त्यावर तिरंगा जाळायचा आहे की काय? तुम्ही देशद्रोहाचा गुन्ह रद्द करायला निघाले आहात. मग तुम्ही कोणत्या देशातले आहात ते तरी सांगा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच काँग्रेस इतके दिवस चायवाला यावर चर्चा करत होते आता ते चौकीदार म्हणून नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. त्यामुळे काँगेसच्या नेत्यांच्या बुद्धीची कीव येते, असे म्हणत देशाचा चौकीदर बनणे काय चुकीचे आहे का? असा सवाल त्यानी काँगेसला विचारला.

यावेळी माजी खासदार शिवाजी माने यांनी विरोधकांवर कडाडून टिका केली. तसेच काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात असलेले सुभाष वानखेडे यांच्या शिक्षणाची त्यांनी खिल्ली उडवीत, त्यांचे काही किस्सेही सांगितले. तसेच माजी मंत्री सुर्यकांता पाटील यांनी जनतेने त्यांच्यावर दाखविलेल्या प्रेमाबद्दल हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details