महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत तलवारीने वार करून एकाचा खून

वसमत तालुक्यातील मळवटा फाटा येथील कमल पुष्प बारमध्ये तलवारीने वार करून खून केल्याची खळबळजनक घडना घडली आहे. जुन्या भाडंणाच्या वादातून हा खून करण्यात आला आहे.

shiva soda

By

Published : Jul 1, 2019, 1:41 PM IST

हिंगोली- वसमत तालुक्यातील मळवटा फाटा येथील कमल पुष्प बारमध्ये तलवारीने वार करून एकाचा खून केल्याची खळबळजनक घडना घडली. शिवा सोदा, असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून जुन्या भांडणाच्या वादातून हा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रभाकर शीरसागर, रामा शीरसागर, भरत शीरसागर, सोनू शीरसागर, अमोल शीरसागर, भागवत जाधव यांच्याविरोधात वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी भट्टीगली वसमतचे रहिवाशी आहेत.

मळवटा फाटा येथेरविवारी रात्री आरोपी असलेल्या मटण खानावळीवर बसले होते. यावेळी त्यांच्यात अचानक जोराचे भांडण झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपींनी शिवावर तलवारीने सपासप वार केले व तेथून पळ काढला.


शिवा याला उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासाअंती मृत घोषीत केले. या प्रकरणी श्रीराम बाबुराव सांडे यांच्या फिर्यादीवरून ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने हिंगोली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details