हिंगोली - जिल्ह्यातील ईसापूर रमना येथील खून प्रकरणात हिंगोली जिल्हा न्यायालयाने एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. राजू बबन चौतमल यांच्या खूनप्रकरणी आरोपी बाबूराव यमाजी चौतमल (२४) याला हिंगोली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा अन् ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली.
बासंबा पोलीस ठाण्यात ११ डिसेंबर २०१५ ला राजू बबन चौतमल यांच्या पत्नी अश्विनी राजू चौतमलच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा रजिस्टर क्रमांक ९२- २०१५ कलम ३०२, ३२३, ५०४ कलमान्वये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास तपासीक अंमलदार साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर आढे यांनी केला होता. व हिंगोली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यान न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे चौतमल कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.