हिंगोली- तालुक्यातील बासंबा फाट्यापासून काही अंतरावर ट्रक दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वारटा ट्रकच्या मागच्या चाकाखाली दबून जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली.
दुचाकीची ट्रकला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू - हिंगोली बातमी
हिंगोली तालुक्यातील बासंबा फाट्यापासून काही अंतरावर दुचाकीने ट्रकला पाठिमागून धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
पंढरीनाथ संभाजी वसू (रा. सिरसम, ता. हिंगोली), असे मृताचे नाव आहे. पंढरीनाथ आणि त्याचा एक मित्र दोघेजण दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. तर हिंगोली-वाशिम रस्त्यावरील अन्नपूर्णा शाळेजवळ अचानक दुचाकीने पाठीमागून ट्रकला धडक दिली. यात पंढरीनाथ हा ट्रकच्या मागील चाकाखाली गेला. ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात येताच त्याने ब्रेक मारले. मात्र, पंढरीनाथ हा मागील दोन्ही चाकाच्या मधोमध अडकल्या गेला होता. त्याच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा कमरेखालील भाग हा पूर्णपणे चेंदामेंदा झाला तर डोके देखील पुढील चाकामध्ये अडकून फुटले होते. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याने घटनास्थळी धाव घेतली.
घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे. याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. तर जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णलयात उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.