हिंगोली - सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे शेळ्यांना चारा आणण्यासाठी गेलेल्या एका पशुपालकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. शेख युसूफ शेख अनवर (वय ७० वर्षे) असे मृताचे नाव आहे.
विजेचा 'शॉक' लागून पशुपालकाचा मृत्यू; पुसेगावातील घटना - hingoli
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे शेळ्यांना चारा आणण्यासाठी गेलेल्या एका पशुपालकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला.
अनवर यांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे. ते काल (मंगळवारी) नेहमीप्रमाणे गावापासून जवळच असलेल्या स्मशानभूमी परिसरात चारा काढण्यासाठी एका झाडावर चढले होते. त्यावेळी झाडपाला तोडत असता, त्यांचा झाडावरून गेलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला. त्यावेळी विद्यूत प्रवाहित असल्याने ते तारेलाच चिटकले आणि त्यांचा काही क्षणात मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, अनवर यांच्या मृत्यू मुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. अन्वर यांचा पारंपरिक शेळी पालन व्यवसाय होता. त्यामुळे ते परिसरात चांगलीच परिचित होते. अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला.