हिंगोली - तालुक्यातील कलगाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. मागून येणाऱ्या ट्रकने या दुचाकींना धडक दिली. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी सातच्या सुमारास हा घटना घडली.
हिंगोलीत ट्रकची दुचाकींना धडक; एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी - Hingoli Accident News
कलगाव फाट्याजवळ मागून येणाऱ्या ट्रकने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले. शिवशंकर भगवान पुरी(वय ३७, रा. भिरडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
शिवशंकर भगवान पुरी(वय ३७, रा. भिरडा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शिवशंकर हे वॉचमनची ड्युटी करून दुचाकीने घराकडे जात होते. आणखी एका दुचाकीवर दोघे जण प्रवास करत होते. अचानक हिंगोलीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने कलगाव फाट्यावर शिवशंकर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात शिवशंकर हे पूर्णपणे चिरडले गेले तर सोबत असलेल्या दुचाकीवरील दोघे रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. काही अंतरावर जाऊन ट्रक देखील पलटी झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहूल तायडे, सहायक पोलीस निरीक्षक बी. एच. कांबळे, राजेश ठोके, अशोक धामणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने प्रथम जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून शेवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.