हिंगोली- अकोला-हिंगोली रोडवर मागील काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरूच आहे. रविवारी झालेल्या कार अपघातात एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला होत. त्याच रोडवर आज (मंगळवार) झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. माळहिवरा परिसरातील पेडगाव भागात हा अपघात झाला आहे.
कृष्णा कुंडलिक ढगे (वय ३५) असे त्याचे नाव आहे. कृष्णा आणि शेखर इंगोले हे दोघेजण एका मित्राचा विवाहसोहळा आटोपून दुचाकीने हिंगोलीकडे निघाले होते. दरम्यान, माळहिवरा परिसरातील पेडगाव भागात एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात कृष्णा हा रोडवर चार ते पाच फूट घासत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र हा गंभीर जखमी झाला आहे.