महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीकरांना पाण्याचे महत्व उमगले; गणेशभक्तांनी जलसंवर्धनाचा केला संकल्प

हिंगोलीकरांना पाणीबचतीचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी गणेशोत्सवानिमित्त जलसंवर्धनाचा संकल्प केला आहे.

गणेशभक्तांनी जलसंवर्धनाचा केला संकल्प

By

Published : Sep 5, 2019, 10:38 AM IST

हिंगोली- जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईमुळे हिंगोलीकरांना पाणीबचतीचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात हिंगोलीकरांनी जलसंवर्धनाचा संकल्प केला आहे.

गणेशभक्तांसोबत जलसंवर्धनाबाबत चर्चा करताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

जिल्ह्याच्या नशिबी दरवर्षी पाणीटंचाई चे संकट असते मात्र यंदाच्या गणेशोत्सवात हिंगोली करांना पाणी बचतीचे महत्त्व उमगले असून भविष्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होणार नाही यासाठी आतापासूनच संकल्प करत आहेत. ईटीव्ही भारत च्या माध्यमातून गणेश मंडळासह गणेश भक्ताकडून करुया संकल्प जलसंवर्धनाचा या उपक्रमातून प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावर सर्वांनीच पाणीबचतीसाठी आम्ही अतोनात प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

हिंगोली मागासलेला जिल्हा म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. जिल्ह्यामध्ये दरवर्षीच पाणीटंचाईचे संकट निर्माण होत असल्याने टँकरच्या पाण्यावर हिंगोलीकरांना तहान भागवावी लागते, तर ग्रामीण भागात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे हिंगोलीकरांनी पाणी बचतीचा संकल्प केला आहे. त्यासाठी त्यांनी गणरायाच्या उत्सवात पाणीबचतीचा नारा दिला आहे, तर काही गणेश मंडळ वॉटर हार्वेस्टिंगचे प्रात्यक्षीक दाखवणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details