हिंगोली- जिल्ह्यातील दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी वेगाने वाढत आहे. आदल्या दिवशी 22 तर लगेच दुसऱ्या दिवशी 14 जवानांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 90 वर पोहोचल्याने जिल्हा हा शतकाच्या उंबरठ्यावर आहे. आतापर्यंत 83 जवानांना कोरोनाची लागण झालेली आहे.
संपूर्ण जगभरात कोरोनाबाधित रुग्णाचे आकडे हैराण करून सोडत आहेत. त्याच धर्तीवर आता हिंगोली जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी ही हिंगोलीकरांच्या चिंतेत भर टाकत आहे. आधी 22 जवानांना तर लगेच आज 14 जवानांचे अहवाल कोरोनाबाधित आल्याने, त्यांच्या संपर्कात आलेल्या जवानांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.