हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वचजण हैराण झालेले आहेत. अशा विदारक परिस्थितीत अनेकजण मदतीसाठी हात पुढेदेखील करत आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंगोली येथील सेक्रेट हार्ट शाळा परीसरात असलेल्या चर्चच्या वतीने गरजूंना काही प्रमाणात धान्य वाटप केले जात आहे. सकाळी वाटप केल्यानंतर सायंकाळी हमालवाडी परिसरातील महिला मोठ्या संख्येने चर्च समोर धान्याच्या प्रतीक्षेत बसल्याचे पहावयास मिळाले. दुसरीकडे मात्र, शासन म्हणते की कोणीच उपाशी राहणार नाही, तशी व्यवस्था त्या त्या जिल्ह्यात केली आहे. मग, हिंगोलीचा प्रशासनाला का विसर पडला असावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोना इफेक्ट : मदतीच्या प्रतीक्षेत गरजवंत महिला येशूच्या दरबारी तात्कळत - corona in maharashtra
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील सेक्रेट हार्ट शाळेजवळील चर्चदेखील गरजवंत यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी सकाळी काही गरजवंत कुटुंबांना त्यांनी धान्य स्वरूपात मदत केली. मात्र, सायंकाळीदेखील ते मदत करतील या आशेपोटी महिला दुपारपासून चर्चसमोर तात्कळत बसल्या होत्या.
कोरोनामुळे सर्वसामान्यांची व हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबांवर मोठे आभाळ कोसळले आहे. हाताला कामात नसल्याने त्यांच्या खाण्यापिण्याचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे. कोठेही मदत मिळत नसल्याने महिला व पुरुष धान्याच्या मदतीसाठी शहरात इतरत्र धाव घेत आहेत. हिंगोली शहरात एक दानशूर पुढे आले आहेत त्यामुळे त्या दानशुरांच्या घरापुढे गरजवंत महिला व पुरुष मदतीच्या प्रतीक्षेत ताटकाळत बसून राहत आहेत.
हिंगोली शहरातील सेक्रेट हार्ट शाळेजवळील चर्चदेखील गरजवंत यांच्या मदतीसाठी धावून आले. सकाळी काही गरजवंत कुटुंबांना त्यांनी धान्य स्वरूपात मदत केली. तर, सायंकाळीदेखील ते मदत करतील या आशेपोटी महिला दुपारपासून चर्चसमोर तात्कळत बसल्या होत्या. भुकेपुढे त्या सोशल डिस्टंन्सिंगही विसरुन गेल्या होत्या. मात्र, खरोखरच कोरोनामुळे अशा गरीब कुटुंबाची मोठी दैना होत आहे. त्यामुळे नगरपालिका व महसूल प्रशासनाकडून अशा गरजवंत कुटुंबांची चौकशी करुन त्यांना मदत करण्याची मागणी या महिला वर्गातून केली जात आहे.