हिंगोली - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयातही जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी भाजप सरकार आणि ईडीचा निषेध करण्यासाठी सेनगाव बंदची हाक दिली आहे.
भाजप सरकार अन् ईडीच्या निषेधार्थ सेनगाव बंद - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी सेनगाव बंदची हाक दिली आहे.
हेही वाचा - हिंगोलीमध्ये 20 लाखांचा गुटखा जप्त, शेतमालक ताब्यात
या संदर्भात सेनगाव तहसीलदारांना गुरूवारी निवेदन देण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्यासाठीच हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सेनगाव येथे शुक्रवारी व्यापारी, दुकानदार आपली दालने बंद ठेवणार आहेत.