महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#COVID19: हिंगोलीतील नरसी नामदेव मिठाची यात्रा रद्द...

कोरोना बाबत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात सांस्कृतिक, धार्मिक, क्रिडा कार्यक्रम रद्द केले आहेत. नरसी नामदेव येथील मिठाची यात्राही रद्द केली आहे.

narsi-namdev-yatra-canceled-in-hingoli-due-to-corona-virus
हिंगोलीतील नरसी नामदेव मिठाची यात्रा रद्द...

By

Published : Mar 19, 2020, 4:42 PM IST

हिंगोली- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही त्याचा विळखा वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शासनाने मोठे धार्मिक स्थळे, माॅल्स, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नरसी नामदेव येथील आषाढी एकादशीला होणारी यात्रा रद्द करण्यात आली. मिठाची यात्रा म्हणून येथील यात्रेची सर्वदूर प्रसिद्धी आहे.

हिंगोलीतील नरसी नामदेव मिठाची यात्रा रद्द...

हेही वाचा-कोरोना : 31 मार्चपर्यंत मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा बंद

खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जमाव बंदीचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात सांस्कृतिक, धार्मिक, क्रिडा कार्यक्रम रद्द केले आहेत. नरसी नामदेव येथील मिठाची यात्राही रद्द केली आहे. यावर्षी 19 मार्च रोजी या यात्रेस सुरुवात होणार होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिलेल्या आदेशाच पालन करीत नरसी येथील जीर्णोद्धार समितीच्या वतीने 31 मार्च पर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

या काळामध्ये कोणतेही धार्मिक कार्यक्रम साजरे होणार नाहीत. मात्र, विना वादन, संत नामदेवाची पूजा, आरती, पहारेकरी, सेवादार यांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे. तर ओंढा नागनाथ तालुक्यातील कोथळज येथील गैबी पीर संदल यात्राही रद्द केली असून अतिशय साध्या पध्दतीने गैबीपीर यांच्यावर चादर चढवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details